Monday, May 20, 2024
Homeक्राईम१९ गंभीर गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना पकडण्यात 'अ.नगर एलसीबी' यश

१९ गंभीर गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना पकडण्यात ‘अ.नगर एलसीबी’ यश

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर
: १९ गंभीर गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना पकडण्यात ‘अहमदनगर एलसीबी’ यश आले आहे. शरद कैलास काळे (वय २५, रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर), तुषार उर्फ विशाल कैलास काळे (वय २७ ) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार सपोनि हेमंत थोरात, पोना रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले, भिमराज खर्स, संतोष खेरे, पोकाॅ अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, सागर ससाणे, रोहित वेमुल, शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, चालक पोकाॅ अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस अधिकारी व अंमलदार असे पारनेर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असतांना एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना दि.३ डिसेंबर २०२३ रोजी माहिती मिळाली की, फरार आरोपी शरद केलास काळे व विशाल केलास काळे हे त्यांचे राहत्या घरी आल्याची माहिती मिळाली. आरोपींच्या राहत्या घरी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याबाबत कळविले. एलसीबी टिम’ने आरोपीचे घरी जात असतांना आरोपींनी पोलीस पथकास पाहून पळू लागले असता पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतली. ताब्यात घेतलेल्या आरोपींना त्यांची पूर्ण नांव गांव पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे शरद कैलास काळे (वय २५, रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर) व तुषार उर्फ विशाल कैलास काळे (वय २७ ) असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीना पुढील तपासकामी बेलवंडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६७/२०२३ भादवि कलम ३८०, ३४२, ३४ चे तपासकामी बेलवंडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पुढील तपास वेलवंडी पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments