Monday, May 20, 2024
HomeVideo Newsव्यापाऱ्याचे अपहरण करुन लुटमार करणारी टोळी पकडली ; अ.नगर एलसीबी टिम'ला यश

व्यापाऱ्याचे अपहरण करुन लुटमार करणारी टोळी पकडली ; अ.नगर एलसीबी टिम’ला यश

Nagar Reporter
Online news Natwork (video)
अहमदनगर :
व्यापाऱ्यास आडवून अपहरण करुन लुटमार करणारी सराईत आरोपींची टोळी पकडण्यात अहमदनगर एलसीबी टिम’ला यश आले आहे. Crmie News

  • योगेश कैलास खरात (वय २४, रा. भोजडे चौक, ता. कोपरगांव), अनिल आण्णासाहेब मालदोडे (वय ३०, रा. पिंपळवाडी, माऊली नगर, शिर्डी, ता. राहाता), गुड्डू ऊर्फ सागर विठ्ठल मगर (वय २१, रा. हनुमानवाडी, कान्हेगांव, ता. कोपरगांव), सोनू ऊर्फ सोन्या सुधाकर पवार (वय २५, रा. हॉलीडे पार्क शेजारी, शिर्डी, ता. राहाता) ही पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.तर फरार धनंजय प्रकाश काळे (रा. रामवाडी, सवत्संर, ता. कोपरगांव), मयुर अनिल गायकवाड (रा. इंदीरानगर, ता. कोपरगांव) ही दोघे आहेत, या दोघा आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
  • एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम, श्रीरामपूर डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीचे सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ मनोज गोसावी, अतुल लोटके, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष खैरे, विजय ठोंबरे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोकॉ आकाश काळे, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, किशोर शिरसाठ, चापोहेकॉ उमाकांत गावडे व अर्जुन बडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१२ जून २०२३ रोजी ड्रायव्हर ब्रिझा गाडी (एमएच/१४/जीएस/४४२२) मधून राहुरीकडे येत असताना अज्ञात सिल्व्हर रंगाचे कार चालकाने ताब्यातील कार आडवी मारुन अनोळखी चौघांनी हातातील कत्तीने गाडीची काच फोडून मला व ड्रायव्हर यांना गाडीचे खाली ओढून डोळ्यावर पट्टी बांधून गाडीत खाली बसविले. अज्ञात स्थळी नेऊन कंबरेच्या पट्याने व अज्ञात टणक वस्तूने मारहाण करुन बॅगेमध्ये ठेवलेली रोख रक्कम, गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन व हातातील एक तोळा वजनाची अंगठी असा एकूण १० लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला व मला व साक्षीदार यांना वांबोरी घाटाजवळ सोडून आरोपी पळून गेले होता, या अनिल रामचंद्र घाडगे (वय ४८, रा. घोरपडवाडी, ता. राहुरी) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६४१/२०२३ भादविक ३९४,३६४ (अ), ३२३,३४१,५०४,५०६,३४ प्रमाणे अपरहरणासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेनंतर एसपी राकेश ओला यांनी एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना ना उघड गुन्हा उघडकीस आणणे करीता पथक नेमून समांतर तपास करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.
आदेशा प्रमाणे पोनि श्री. आहेर यांनी एलसीबी टिम’ नेमून ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना देवू एलसीबी टिम’ला रवाना केले होते. पथक राहुरी व राहाता परिसरात फिरुन ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना दि.१५ जून २०२३ ला पोनि श्री.आहेर यांना माहिती मिळाली. त्या माहितीनुसार एलसीबी टिम’ने तात्काळ सावळीविहीर फाटा, शिर्डी येथे जाऊन सापळा लावला. दरम्यान ६ जण संशयीत हालचाली करताना दिसून आले. पोलिसांची खात्री होताच अचानक त्यांचेवर छापा घालताच त्यातील दोघे गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले व उरलेल्या चारजण हे देखील पळून जाण्याचे प्रयत्नात असताना त्यांचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. पकडलेल्यांनी फरारींची नांवे सांगितली.
ताब्यातील चार आरोपींकडे गुन्ह्याचे अनुषंगाचे विचारपुस करता त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच गुन्हा करणे करीता त्यांना किरण बबन कोळपे (रा. विळद, ता. जि. अहमदनगर) आकाश पांडुरंग शिंदे (रा. पाण्याचे टाकीजवळ, विळद, ता. जि. अहमदनगर), महेश विठ्ठल वाघ व सोनु ऊर्फ शुभम रावसाहेब ठोंबे, (दोन्ही रा. खांडके, ता. जि. अहमदनगर) यांनी मदत केली असल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपींना सोबत घेऊन आरोपींचा यांचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडुन गुन्ह्यात जबरीने चोरी केलेल्या मालमत्तेपैकी २ लाख १ हजार रुपये रोख रक्कम, १ लाख २० हजार रु. किंमतीची सोन्याची चैन, गुन्हा करणेसाठी वापरलेले ७ लाख रुपये किंमतीची सिल्व्हर रंगाची डस्टर वाहन, एक १०० रुपये किंमतीचा रामपुरी चाकु व आरोपींचे ताब्यातील १ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण १० लाख ३६ हजार १०० रुपये किंमतींचा मुद्देमाल मिळून आला. आरोपींना ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील कारवाई राहुरी पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments