Monday, May 20, 2024
Homeक्राईमवृद्ध महिलांचे चोरी गेलेले सोन्याचे दागिने परत मिळवून देण्यात नगर तालुका पोलिसांना...

वृद्ध महिलांचे चोरी गेलेले सोन्याचे दागिने परत मिळवून देण्यात नगर तालुका पोलिसांना यश

👉सपोनि राजेंद्र सानप हजर होताच यशस्वी कामगिरी
ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर-
नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील माजी सैनिकाच्या घरातील वृद्ध महिलांच्या गळ्यातील जबरी चोरीस गेलेले 65 हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांकडून मिळविण्यात नगर तालुका पोलिसांना मोठे यश आले आहे. ती दागिणे नगर तालुका पोलीसांनी त्या माजी सैनिकांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. दरम्यान नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांनी
चोरीचा मोठ्या चाणक्षाने तपास लावून चोरीस गेलेला मुद्देमाल मिळवून दिल्याबद्दल विशेषतः संपूर्ण नगर तालुका पोलिस कर्मचा-यांचे नगर तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.

समजलेली माहिती अशी की, नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुंडेगाव येथील माजी सैनिकाच्या घरातील वृद्ध महिलांच्या गळ्यातील जबरी चोरी केलेले अंदाजे 65 हजार  किमतीचे सोन्याचे दागिने त्यांना न्यायालीन सर्व प्रक्रिया पूर्ण करून नगर तालुक्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्याकडून कुटुंबीयांना सुपूर्त करण्यात आले. दि. 27 एप्रिल 2021 रोजी रात्री घरात घुसून दोन वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ व सोन्याचे मनिमंगळसूत्र असे दागिने जबरी चोरी करून नेले होते. या घटनेबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुरन  205/21 भादवि कलमान्वेय  392,34 प्रमाणे गुन्हा दाखल होता.
   या गुन्ह्यात नगर तालुक्याचे सपोनि राजेंद्र सानप, पोउपनि श्री बोडखे व नगर तालुका पोलिस यांच्या पथकाने  तीन आरोपीना अटक करून 13 गुन्हे उघडकीस आणले होते. या गुन्हयापैकी गुंडेगाव मधील गुन्ह्यातील मुद्देमाल शुक्रवारी (दि.29) न्यायालयीन  प्रक्रिया पूर्ण करून नगर तालुका पोलिसांकडून  गुंडेगाव येथील भापकर कुटुंबियांना दागिने सुपूर्त करण्यात आले. यावेळी गुंडेगाव मधील भास्कर कुटुंबीयांनी नगर तालुका पोलिसांचे आभार मानले. त्या भगिनी म्हणाल्या की, आम्ही असे ऐकले होते की चोरी झाल्यानंतर आपले दागिने आपल्याला परत मिळतील की नाही.
घटना झाल्यावर श्री. सानप म्हणाले होते की,  आजी काळजी करू नका. आम्ही चोरी करणाऱ्यांना लवकरच पकडून तुमचे दागिने तुम्हाला मिळवून देऊच  नगर सपोनि राजेंद्र सानप यांनी आम्हाला ते मिळवून दिले, असे म्हणून भापकर कुटुंबाने नगर तालुका पोलिसांचे शतशः आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments