Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रलष्करात बनावट कॉल लेटर देऊन भरती होणारे चौघे, तर भरती करवून देणा-यां...

लष्करात बनावट कॉल लेटर देऊन भरती होणारे चौघे, तर भरती करवून देणा-यां दोघांना अटक

नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर
: लष्करामध्ये बनावट कॉल लेटर देऊन भरती होणारे चारजण व भरती करवून देणा-यांची आंतरराज्य टोळी पकडण्याची महत्त्वपूर्ण कारवाई अहमदनगर लष्कराच्या अधिकारी व भिंगार कॅम्प पोलिसांनी केली आहे. या कारवाईत पकडण्यात आलेल्या ६ जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि दिनकर मुंडे यांच्या सूचनेनुसार पोसई मंगेश बेंडकोळी, पोसई किरण साळुंके, सफौ अकोलकर, पोहेकाँ रेवननाथ दहीफळे, पोहेकाँ गणेश नागरगोजे, पोहेकाँ संदिप घोडके, पोहेकाँ राठोड, पोहेकाँ रघुनाथ कुलांगे, पोना राहुल द्वारके, पोना दिलीप शिंदे, पोकाँ रमेश दरेकर, पोकाँ संतोष टेकाळे, पोकाँ अविनाश कराळे, पोकाँ समीर शेख, चापोकाँ अरूण मोरे, मपोकाँ येणारे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, लोकेश कुमार तेजापल सिंग (वय २५ रा. मिर्झापुर पोस्ट धनकोट ता. जि. गौतमबुद्धनगर, उत्तर प्रदेश), गोपाळ रामकिसन चौधरी (वय २० रा. सिखरणा पोस्ट. छरा ता. आतरोली जि. अलिगढ उत्तरप्रदेश) या दोघांनी आदर्श नांगेलाल कुशवाह (वय १९ रा. रात्योरा, पो. करपीया ता. कोरॉन. जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश), मोहीत कुमार माणीकलाल यादव (वय २५ रा. कासीमाबाद सारंगपुर पोस्ट दांडूपुर ता. करचना जि.प्रयागराज,उत्तरप्रदेश), आनंद श्याम नारायण शर्मा (वय २३, रा. सडवा कला पीसी गेट जवळ, पोस्ट टी एस एल ता. करचना जि.प्रयागराज, उत्तर प्रदेश), अंशू राजेंद्र कुमार तेजपाल सिंग (वय २५, रा. मांझीगाव मरोका पोस्ट दांडी ता करचना जि.प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांच्याकडून ७ लाख ५० हजार रुपये घेऊन नोकरीला लावून देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केलेली आहे.
दि.२३ मे २०२३ ला आरोपी आदर्श नांगेलाल कुशवाह, मोहीत कुमार माणीकलाल यादव, आनंद श्याम नारायण शर्मा, अंशू राजेंद्र कुमार तेजपाल सिंग यांनी A.R.O.मेरठ (उत्तर प्रदेश) यांच्या नावाचे भारतीय सैन्य दलातील अग्निविरामध्ये भरती झाल्याबाबत ट्रेनिंग करण्यासाठी कोठून तरी बनावट कॉल लेटर बनवून ते बंद लिफाफ्यामध्ये सादर करून भारतीय सैन्य दलाची फसवणूक केली. तसेच आरोपी लोकेश कुमार तेजापल सिंग, गोपाळ रामकिसन चौधरी या दोघांनी यांनी आरोपी पहिल्या चौघांकडून ७ लाख ५० हजार रुपये घेऊन नोकरीला लावून देण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेऊन फसवणूक केलेली आहे.
तसेच गुन्ह्यातील आरोपी लोकेश कुमार तेजापल सिंग हा भारतीय सैन्यदलातील जवान नसल्याचे माहित असून देखील त्याने त्याच्या अंगावर सैन्य दलातील अधिकारी गणवेश परीधान करून तोतयागिरी करून आरोपी पहिल्या चौघांना भारतीय सैनिक असल्याचे भासवून भारतीय सैन्य दलाची फसवणूक केल्याची दाखल फिर्यादीवरून
भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गु र नं ३०३/२०२३
भादवि कलम ४२०, ४६८, ४१९, १७१, १७७, १४०, ३४ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे.
यातील पहिल्या चौघा आरोपींना यातील फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या जवान यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात हजर केले. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि श्री मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र टिम तयार करून यातील दोघा आरोपींना अहमदनगर शहरामधून ताब्यात घेतले‌. पोलिसांनी सर्व सहा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments