Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हामहिलांच्या गळ्यातील दागिणे चोरणारी टोळी पकडण्याची 'एलसीबी'ची धडकेबाज कारवाई

महिलांच्या गळ्यातील दागिणे चोरणारी टोळी पकडण्याची ‘एलसीबी’ची धडकेबाज कारवाई

महिलांच्या गळ्यातील दागिणे चोरणारी टोळी पकडण्याची ‘एलसीबी’ची धडकेबाज कारवाई
👉 २ लाख ५ हजार  रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त
  👉 विशेषतः महिला वर्गातून स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- कोपरगाव, राहाता व लोणी परिसरामधून महिलांचे गळ्यातील दागिणे चोरणारी टोळी पकडण्याची धडकेबाज कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. या कारवाईत २ लाख ५ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईचे विशेषतः महिला वर्गातून स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन केले जात आहे.
नागेश राजेन्द्र काळे (वय २०, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर), सोंडया उर्फ अदीत्व गणेश पिंपळे, (वय १९, रा. अशोकनगर कारखाना),  संदीप दादाहरी काळे ( वय ३२, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) अशी पकडण्यात आलेल्या चोरट्याची नावे आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर पोलीस अधीक्षक दिपाली काळे व शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या  मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ विजयकुमार बेठेकर, पोहेकॉ संदीप पवार, पोना शंकर चौधरी, पोना विशाल दळवी, पोना रविकिरण सोनटक्के, पोना दिपक शिंदे, पोकॉ योगेश सातपुते, चालक पोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. २२ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळचे  स्कुटी गाडीवरुन मेहता कन्या विद्यालय, कोपरगाव येथे गेल्यानंतर पाकींगमध्ये स्कुटी गाडी पार्क करीत असताना पाठीमागून मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखींनी गळ्यातील ६० हजार रु. किं. चे सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने तोडून चोरुन नेले होते. या संगीता गणेश देशमुख (रा. साईनगर, कोपरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  कोपरगांव शहर पोलिस ठाण्यात गुरनं. २९३/२०२९ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच जिल्ह्यामध्ये वारंवार चैन स्नॅचिंगच्या घटना घडत असल्यामूळे जिल्हा पोलीस अधिक्षक  तसेच  अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्रीरामपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांना चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून तपासबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे अधिकारी व अंमलदार गुन्हयाचा समांतर तपास सुरु होता. या दरम्यान पो.नि. श्री. कटके यांना गोपनिय माहिती  बातमी मिळाली. सदरचा गुन्हा हा नागेश काळे (रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला आहे. या माहितीनुसार एलसीबी पथकाने
वडाळा महादेव येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन आरोपी  नागेश काळे याला ताब्यात घेतले. त्याचेकडे  गुन्हयाबाबत कसून चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यानंतर पोलिस खाक्या दाखविला. परंतु  गुन्हा हा त्याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळालेली असल्याने दोन पंचासमक्ष त्याचे वडाळा महादेव येथील घराची झडती घेतली असता घरझडतीमध्ये दोन सोन्याचे मिनी गंठण व दोन सोन्याचे मंगळसूत्र असे ६० ग्रॅम वजनाचे दागिने मिळून आले, ते जप्त करण्यात आले. आरोपी नागेश काळे याला पोलिसांनी विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सदरचे दागिने हे त्याने व त्याचे साथीदार  सोंड्या उर्फ अदीत्य गणेश पिंपळे ( रा. अशोकनगर कारखाना), संदीप दादाहरी काळे (रा. वडाळा महादेव) व आणखी एक साथीदार अशांनी मिळुन मागील २ महिन्याच्या  कालावधीमध्ये कोपरगाव शहर, राहाता शहर, लोणी-बाभळेश्वर रोड या ठिकाणाहून रस्त्याने जाणाऱ्या महिलांचे गळ्यातील दागिणे तोडून चोरुन आणले असल्याचे सांगितले.
या माहितीच्या आधारे साथीदार आरोपीतांचा शोध घेऊन आरोपी सोंडया उर्फ अदीत्व गणेश पिंपळे,  संदीप दादाहरी काळे यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. चौथ्या साथीदाराचा पोलिसांनी शोध घेतला असता, तो मिळून आला नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून दोन सोन्याचे मिनीगंठण, दोन सोन्याचे मंगळसूत्र असे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दोन मोबाईल असा एकूण २ लाख ५ हजार रु. किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यानंतर आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार सदर चोरी बाबत संबधित पोलिस ठाणे अभिलेख तपासून दाखल असलेले गुन्हे तसेच सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिणे व आरोपीकडून ताब्यात घेतलेले दागिणे याची पडताळणी करुन खात्री केली असता  चैन स्नॅचिंगचे ४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. यात  कोपरगाव शहर, राहाता व  लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments