Monday, May 20, 2024
HomeVideo Newsपंडीत हाॅस्पिटलमध्ये महिल महा आरोग्य शिबीराचे आयोजन

पंडीत हाॅस्पिटलमध्ये महिल महा आरोग्य शिबीराचे आयोजन

Nagar Reporter
Online news Natwork (video)
अहमदनगर :
भिंगार येथील पंडीत हाॅस्पिटलमध्ये स्व.डाॅ.सविता पंडीत यांच्या स्मरणार्थ ७ वे महिल महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दि.२७,२८ व २९ जानेवारी या तिन्ही दिवशी असणार आहे. शिबिरात विशेषतः महिलांच्या गर्भाशय संबंधित सर्व शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पंडीत हाॅस्पिटलचे डॉ.ऋषिकेश पंडीत यांनी ‘नगर रिपोर्टर’ शी बोलताना दिली.

अहमदनगर जिल्ह्यातील पहिलं ३-डी लॅप्रोस्कोपी सेंटर व अत्याधुनिक तंत्रज्ञान पंडीत हाॅस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. शिबिरात लॅप्रोस्कोपीक गर्भाशयाच्या कॅन्सर सर्जरी, गर्भनलिकेतील ब्लॉकेज काढणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया उलटवणे, गर्भाशयातील पडदा काढणे, गर्भाशय काढणे, फिच्युला सर्जरी, प्रोलॅप्स सर्जरी,अंग बाहेर येत असल्यास गर्भाशय न काढता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, एण्डोमेट्रीऑसीस सर्जरी, अंडाशयाच्या गाठी काढणे, शिकंताना, खोकताना लघवी होणे, दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन, पि.सी.ओ.डी.सर्जरी या सर्व शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहे. यात औषधे व भूलतज्ज्ञ फी आकारली जाणार आहे, असे डॉ.पंडीत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments