Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकात शनिवारी सायंकाळी ३ चैन स्नॅचिंगिंच्या घटना : महिलांमध्ये भितीचे वातावरण, चोरट्यांचा...

नाशिकात शनिवारी सायंकाळी ३ चैन स्नॅचिंगिंच्या घटना : महिलांमध्ये भितीचे वातावरण, चोरट्यांचा बंदोबस्त करा…

गजानन कुलकर्णी
Nagar Reporter
Online news Natwork
नाशिक –
शहरात शनिवारी सायंकाळी पोलिस आयुक्तालय परिसरातील दोन चौकात तर एका लोकप्रतिनिधीच्या परिसरात चाकूचा धाक दाखवून चैन स्नॅचिंगिंच्या घटना घडल्या आहेत. यासह दररोज घडणाऱ्या घटनांमुळे विशेषात: महिला वर्गामध्ये मोठं भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चैन स्नॅचिंगिं करणाऱ्या चोरट्यांचा नाशिक पोलिस प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

पोलीस कमिशनर दर्जाचा अधिकारी या शहरात असून देखील तसेच पर्याप्त पोलीस मनुष्यबळ असूनही नाशिकमध्ये शनिवारी (दि.५) सायंकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी थोड्या थोड्या अंतराने चेंन स्नॅचींगच्या प्रकार घडले आहेत.

यापैकी एक जेलरोड सैलानीबाबा चौकाजवळील गणेश व्यायाम शाळेजवळ घडला. दुसरा गडकरी चौकाच्या आसपास घडलेला आहे. या दोन्ही घटनांमध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या हिसकावून घेऊन चोरट्यांनी पोबारा करण्यात आली आहे. यावरून असे दिसते आहे की सोनसाखली चोरांचा सुळसुळाट नाशिक शहरात झाला आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाक त्यांना राहिला नाही, असं वाटतं आहे. पोलीसांना आव्हान चोरट्यांनी दिले आहे. रोज या घटना घडूनही पोलिसांना हे चोर सापडत नाहीत ? याचं मात्र मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. सायंकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांमध्ये मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस मात्र सोनसाखळी चोर शोधण्याचे फक्त नाटक करीत आहेत का? त्यामुळेच की काय नाशिक शहरात सोनसाखळी चोर अद्यापपर्यात पोलिसांच्या हाती लागत नाहीत, असाही सवाल नागरिकांमध्ये चर्चीला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments