Monday, May 20, 2024
Homeक्राईमनगर शहरात गावठी कट्टे बाळगणारे तिघे पकडली ः एलसीबी टिमची कामगिरी

नगर शहरात गावठी कट्टे बाळगणारे तिघे पकडली ः एलसीबी टिमची कामगिरी

नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर ः
अहमदनगर शहरात गावठी कट्टे बाळगणारे तिघे सराईत गुन्हेगार पकडण्याची धडकेबाज कारवाई ‘अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे. लखन भाऊसाहेब आल्हाट (वय 32, रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर), लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे (रा.मोरया, चिंचोरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर), अविनाश उर्फ देविदास उर्फ आबा विक्रम उर्फ विक्रांत आल्हाट (रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. एसपी राकेश ओला, अहमदनगर अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूdiy cat home bradley dolma kalem jersey soccer custom nfl shop 49ers elan sanke nike huarache womens white custom bike jerseys custom bball jerseys فستان عرس كلاسيكي الكويت elan sanke nfl jersey shop custom softball jerseys μπαταρια iphone εγγύηση 302 κυκλουσ nike air max 270 women’s sale violet shampoo before and after चनेनुसार एलसीबीचे सपोनि हेमंत थोरात, सफौ भाऊसाहेब काळे, पोना रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, संदीप दरंदले, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, पोकॉ बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, चासफौ उमांकात गावडे आदिंच्या टिमने ही कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, एसपी राकेश ओला यांनी एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्या आदेशान्वये एलसीबी पोनि श्री.आहेर यांनी एलसीबीची टिम तयार करुन जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणा-यांचा शोध घेऊन कारवाई करणेकामी सुचना िदिल्या होत्या. त्यानुसार एलसीबी टिमने जिल्ह्यातील यापूर्वी अग्शिस्त्रे बाळगणार्‍यांचे रेकॉर्ड तपासून अग्निशस्त्राची माहिती काढत असतांना पोनि श्री आहेर यांना लखन भाऊसाहेब आल्हाट (रा. नेवासा) हा त्याचे साथीदारासह विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा (अग्निशस्त्र) आपले कब्जात बाळगून ते विक्री करण्याचे उद्देशाने भिस्तबाग महालासमोर, सावेडी परिसरामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती एलसीबी टिमला देऊन खात्री करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. एलसीबी टिमने दि.12 फेब्रुवारी 2024 रोजी पंचासह भिस्तबाग महाल, सावेडी परिसर या ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले. या दरम्यान 11.30 वाजण्याच्या सुमारास 3 संशयीत ही भिस्तबाग महालासमोर शाईन दुचाकीवर येऊन थांबले. पथकातील अधिकारी व अंमलदार असे संशयीतांना ताब्यात घेण्यासाठी जात असतांना त्यांना पोलीस संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडील दुचाकी चालू करुन ते पळून जाण्याचे तयारीत असतांना दोघांना जागीच पकडले. एकाचा पाठलाग करुन पकडण्यात आले. ताब्यात घेतलेल्या तिघांकडे चौकशी करता त्यांनी त्यांची नावे लखन भाऊसाहेब आल्हाट (रा. मोरया चिंचोरे, ता.नेवासा, जि. अहमदनगर), लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे (रा. मोरया, चिंचोरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर), अविनाश उर्फ देविदास उर्फ आबा विक्रम उर्फ विक्रांत आल्हाट (रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये 30 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, 1 हजार रुपये किमतीचे 2 जिवंत काडतुसे व 70 हजार रुपये किमतीची विनानंबरची होंडा कंपनीची शाईन दुचाकी असा 1 लाख 1 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांच्याविरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. 154/2024 आर्म अ‍ॅक़्ट कायदा कलम 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी लखन भाऊसाहेब आल्हाट हा सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्याविरुध्द अहमदनगर, छ.संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न, फसवणूक, दुखापत, विनयभंग, अवैध शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. आरोपी लखन सुधाकर सरोदे हा पण सराईत गुन्हेगार आहे. यांच्याविरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये फसवणूक व अवैध शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे 3 गुन्हे दाखल आहेत. आरोपी अविनाश विक्रम आल्हाट हा सराईत गुन्हेगार आहे. यांच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न व चोरी असे गंभीर स्वरुपाचे 2 गुन्हे दाखल आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments