Monday, May 20, 2024
Homeक्राईम'ती' देत होती नव-यास अन्नातून थोडे-थोडे विष ; उपचारादरम्यान उघडकीस

‘ती’ देत होती नव-यास अन्नातून थोडे-थोडे विष ; उपचारादरम्यान उघडकीस

Nagar Reporter
Online news Natwork (Crime)
मुंबई1
:
 संपत्ती मिळविण्यासाठी माणूस कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. याचा प्रत्यय कल्याण परिसरात रविवारी दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्यानंतर मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमध्ये चक्क बायकाने तिच्या साथीदारांसह संपत्तीसाठी नवऱ्याला अन्नातून थोडे-थोडे विष देण्याचे कृत्य केले असून, हा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार  अशी की, मुंबईतील एका व्यावसायिकाचे  १९८९मध्ये आरोपी महिलेशी विवाह झाला होता कालांतराने  २०१२पासून जोडपे त्यांच्या दोन मुली आणि एका मुलासोबत शिवडी येथे वास्तव्यास आहेत. काही वर्षांपासून जोडप्याचा आपापसात वाद सुरू होता. तर काही दिवसांआधीच पीडित व्यावसायिक पतीने त्याच्या पत्नीवर बँक लॉकरमधून २५ लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप केला होता. याचाच राग मनात घेऊन आणि पतीच्या संपत्तीसाठी त्या आरोपी महिलेने पतीला मारण्याचा कट रचला होता.

पीडित पतीने त्याच्या पत्नीने बॅंक लॉकरमधून  २५ लाख रुपये रोख आणि दागिने चोरल्याचा आरोप केल्यानंतर आरोपी महिलेने तिची बहिण आणि भावाच्या मदतीने पतीला संपविण्याचा कट रचला होता. त्यांच्या कटाचा भाग म्हणजे पीडित पतीला अन्नातून किंवा इतर स्वरुपात रोज थोडे-थोड विष देणे हा होता.आरोपी महिलेकडून पतीला दररोज थोड थोड अन्नातून किंवा इतर स्वरूपात विष देण्यात येत होते. कालांतराने प्रकृती अस्वास्थ्यामुळे पीडीत पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान व्यावसायिकाला विष दिल्याचे समोर आले. त्यानंतर तक्रारदाराने आरएके मार्ग पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार केली. रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी एक ५३वर्षीय महिलेविरोधात पतीला विष देऊन हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पत्नीसोबत तिची बहीण आणि भावाचा सुध्दा गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
प्राथमिक चौकशी करण्यात आल्यानंतर कट रचणे, खुनाचा प्रयत्न, चोरी, गुन्हेगारी धमकी यावरून भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

  1. ↩︎
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments