Monday, May 20, 2024
Homeक्राईमडिलीव्हरी बॉयला लुटणारी टोळी : श्रीरामपूर शहर, तालुक्यात वाळू चोरांना पोलिसांनी पकडले

डिलीव्हरी बॉयला लुटणारी टोळी : श्रीरामपूर शहर, तालुक्यात वाळू चोरांना पोलिसांनी पकडले

डिलीव्हरी बॉयला आडवून चॉपरने वार करुन लुटणारी टोळी जेरबंद ; अ.नगर एलसीबी कारवाई
Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर :
जिल्ह्यातील पुणतांबा – श्रीरामपूर या मार्गावर ऍ़मेझॉन कंपनीचे डिलीव्हरी बॉयला रस्त्यात आडवून त्यांच्यावर चॉपरने वार करुन लुटणाऱ्या ७ जणांच्या टोळीस मुद्देमालासह पकडण्याची‌ कामगिरी अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे
ज्ञानेश्वर बाळासाहेब गांगुर्डे (वय २२, रा. पिंपळवाडी, ता. राहाता), कार्तिक नारायण पांडे, (वय२१, रा. सिंगपुर, ता. भदोनी, राज्य उत्तर प्रदेश हल्ली रा. शिर्डी, ता. राहाता), साईनाथ गोरक्षनाथ पाचरणे (वय १९, रा. राजगुरुनगर बिरोबा रोड, शिर्डी, ता. राहाता), शुभम कांतीलाल माळी ( वय १९, रा. व्दारकानगर, बिरोबारोड, शिर्डी, ता. राहाता), प्रशांत नारायण सोनवणे‌ ( वय १९, रा. शिंगवे रोड, पिंपळवाडी, ता. राहाता) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे असून अन्य उर्वरित अल्पवयीन आहेत.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम, शिर्डी डिवायएसपी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सुचनेनुसार एलसीबीचे सपोनि दिनकर मुंडे, सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, भिमराज खर्से, विशाल दळवी, दिपक शिंदे, पोकॉ विनोद मासाळकर, रविंद्र घुंगासे, मयुर गायकवाड, रणजीत जाधव, रोहित येमुल, सागर ससाणे, मेघराज कोल्हे व चापोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या ‘टिम’ने ही कामगिरी केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पुणतांबा ते श्रीरामपूर रस्त्याने दुचाकीवर जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अनोळखी तिघांपैकी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाने दुचाकीला लाथ मारुन धक्का देऊन खाली पाडून चॉपरसारख्या धारदार हत्याराने डोक्यावर मारुन जखमी केले. यावेळी खिशातील १५ हजार रुपये रोख, १८ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल व डिलीव्हरी बॅग हिसकावून एकूण ३३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला. या घटनेबाबत दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६६/२०२३ भादविक ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर एसपी राकेश यांनी एलसीबीचे पोनि अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून गुन्ह्याचा समातंर तपास करुन गुन्हा उघडकिस आणण्यासाठी आदेश दिले होते. या आदेशान्वये पोनि श्री. कटके यांनी एलसीबी टिम’ला सूचना देऊन रवाना केले. पथक पुणतांबा व राहाता परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि श्री कटके यांना माहिती मिळाली ज्ञानेश्वर गांगुर्डे याने त्याचे ५ ते ६ साथीदारासह गुन्हा केला. ते सर्व शिर्डी रेल्वे स्टेशन परिसरात लपून बसलेले आहेत. आता गेल्यास मिळून येईल, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यावरुन पोनि श्री कटके यांनी ती माहिती एलसीबी टिम’ला दिली. खात्री करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार माहिती ठिकाणी शिर्डी रेल्वे स्टेशन परिसरात संशयीतांचा शोध घेत असताना काटवनात एका झाडाखाली काहीजण बसलेले दिसले. छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्याचे तयारीत असताना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळून जाऊ लागले. त्यांचा पाठलाग करुन ७ जणांना शिताफीने ताब्यात घेतले. तसेच एकजण काटवनातील झुडपाचा फायदा घेऊन पळून गेला. त्याचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. ताब्यात घेतलेल्यांना पोलीसांची ओळख सांगून त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सांगितली. तसेच त्यांचे ताब्यात घेतले, इतर दोन साथीदार अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता ते समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडती मध्ये गुन्ह्यात चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम, एक चॉपर व ऍ़मेझॉन कंपनीचे डिलेव्हरी सामान असा एकुण ३३ हजार १०० रुपये किंमतीचे मुद्देमाल मिळून आल्याने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन राहाता पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील कारवाई राहाता पोलीस करीत आहे.

श्रीरामपूर शहर, तालुका हद्दीत वाळू चोरी, वाहतुकीविरुध्द ‘नगर एलसीबी’ची कारवाई
👉कारवाईत ३६ लाख ९९‌ हजार रुपये किंम
तीचा मुद्देमाल जप्त

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर :
श्रीरामपूर शहर व तालुका हद्दीत अवैध वाळू चोरी व वाहतुकीविरुध्द वेगवेगळ्या दोन ठिकाणी कारवाई करुन ३६ लाख ९९‌ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अहमदनगर एलसीबी टिम’ने केली.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम, श्रीरामपूर डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सुचनेनुसार एलसीबीचे पोना शंकर चौधरी, राहुल सोळुंके, पोकॉ रणजीत जाधव, जालिंदर माने आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली.

एसपी राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनिल कटके यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे टिमला नेमून अवैध वाळू चोरी व वाहतुकीविरुध्द कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने टिम’ने श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करुन अवैधरित्या वाळू चोरी व वाहतूक करणारे २ ठिकाणी छापे टाकले. छाप्यात एकूण ३६ लाख ९९ हजार रुपये किंमतीचे एक सिल्व्हर व एक पांढरे रंगाची झेनॉन, एक सोनालिका ट्रॅक्टर व ट्रॉली, तीन विटकरी, एक लाल व एक हिरवे रंगाचा टेम्पो अशी एकूण ८ वाहने व त्यामध्ये १० ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त केला. यात १५ आरोपींविरुध्द श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस ठाण्यात भादविक व पर्यावरण कायदा कलमान्वये २ गुन्हे दाखल करण्यात आले.
कारवाईत श्रीरामपूर तालुका ८८/२३ भादविक ३७९, ३४ सह पकाक. ३/१५‌ आरोपीचे विशाल गोरख धनवटे (वय २१, रा. रामपूर, ता. श्रीरामपूर),
सागर कारभारी थोरात (वय २७, रा. पुणतांबा, ता. राहाता), नंदू नारायण कोठुळे (वय २९, रा. संजयनगर श्रीरामपूर), रवींद्र काशिनाथ कदम (वय 33 रा गोंडेगाव ता. श्रीरामपूर)
३२ लाख ८९ हजार रुपयांच्या ७ विविध कंपनीची वाहने व एक (९) ब्रास आणि इतर ९ फरार आरोपी
श्रीरामपूर शहर १३५ / २३ भादविक ३७९, ३४ सह पकाक. ३/१५ याप्रमाणे रोहित मायकल रणनवरे (वय २२, रा. काळे गल्ली बेलापुर, श्रीरामपूर) एक फरार, मुद्देमाल ४१ लाख रुपयांची एक झेनॉन गाडी व एक (०१) ब्रास वाळू जप्त करण्यात आला, तर ५ आरोपी ताब्यात घेतले व १० आरोपी फरार झाले आहेत.
या सर्व कारवाईत ३६ लाख ९९ हजार रुपये किंमतीचे एक सिल्व्हर व एक पांढरे रंगाची झेनॉन, एक सोनालिका ट्रॅक्टर व ट्रॉली, तीन विटकरी, एक लाल व एक हिरंवे रंगाचा टेम्पो अशी एकुण ८ वाहने, त्यामध्ये एकूण १० ब्रास वाळू जप्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments