Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब कासार यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब कासार यांचे निधन

Nagar Reporter
Online news Natwork
कोपरगाव :
तालुक्यातील संवत्सर येथील धडाडीचे, झुंजार ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब कासार यांचे नुकतेच अपघातात निधन झाले. मृत्यू ते ४८ वयाचे होते. त्यांच्या पश्चात आई,भाऊ, दोन बहिणी, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे
.
स्व.आप्पासाहेब कासार यांनी कोपरगाव तालुक्यात दै.सार्वमत, पुण्यनगरी, गांवकरी यासह अन्य दैनिकांसाठी काम केले. तसेच ते गोदाप्रवरा साप्ताहिकाचे संपादक होते. या वृत्तपत्रातून कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी ज्वलंत लिखाण केले होते. तालुक्यातील अनेक समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला आपल्या लेखनातून जागे केले. त्यांच्या वृत्तपत्रातील बातम्या लेखणीत त्यांची धार असल्याने स्व.आप्पासाहेब कासार यांना कोपरगाव तालुक्यात झुंजार पत्रकार म्हणून ओळखले जात होते.
पत्रकार स्व.आप्पासाहेब कासार हे स्वभावाने कडक असले तरी, मैत्रीजगतातल ते राजा होते. प्रत्येकांशी हासूनखेळून व आपुलकीने बोलणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अचानक जाण्याने कोपरगाव तालुक्यासह संवत्सर,कोकमठण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments