Monday, May 20, 2024
HomeVideo Newsजिल्ह्यात कत्तलखान्यांवर एलसीबी टिम'च्या कारवाया ; नगर-जामखेड रोडवर मोठी कारवाई

जिल्ह्यात कत्तलखान्यांवर एलसीबी टिम’च्या कारवाया ; नगर-जामखेड रोडवर मोठी कारवाई

👉 ५ हजार किलो गोमांस व टेम्पो ‌असा १४ लाख ५० हजार रुपयांचे जप्त
Nagar Reporter
Online news Natwork (व्हिडिओ)
अहमदनगर –
जिल्ह्यात कत्तलखान्यांवर अहमदनगर एलसीबी टिम’च्या धडाकेबाज कारवाया‌ केल्या आहेत. या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरांचे गोमांस जप्त करण्याची मोठी कामगिरी एलसीबी टिम’ने केली आहे. नगर तालुक्यातील चिंचोली पाटील या ठिकाणी महाराष्ट्रात बंदी असलेले गोवंशीय जातीचे ५ हजार किलो तब्बल १४ लाख ५० हजार रुपयांचे गोमांसासह वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडण्याची कारवाई एलसीबी टिम’ने केली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ संदीप घोडके, दिनेश मोरे, पोना शंकर चौधरी, रवि सोनटक्के, संतोष लोढे, पोकॉ सागर ससाणे, रोहित येमुल व चापोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
एलसीबी पोनि श्री. कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार एलसीबी टिम’ने नगर तालुका पोलीसांच्या मदतीने दोन पंचा सोबत घेऊन नगर जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील या ठिकाणी रोडवर सापळा लावला. माहितीप्रमाणे लाल रंगाचा टेम्पो येताना दिसला, टेम्पो चालकास बॅटरीने लाईट दाखवून थांबण्याचा इशारा करताच टेम्पो चालकाने टेम्पो रस्त्याचे कडेला उभा केला. टेम्पो चालकास व त्याचे शेजारी बसलेल्यास एलसीबी टिम’ने ताब्यात घेतले. त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने मोहसीन मेहमुद खान (वय ४०, रा. कोठला, अहमदनगर), सलीम कलीम कुरेशी (वय ३४, रा. कुरेशी हॉटेल जवळ, अहमदनगर मुळ रा. बहिराईच, बरेली, जि. लखनऊ, राज्य उत्तरप्रदेश) असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष त्याचे आयशर टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशी जातीची जनावरांचे गोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे दिसली. त्याचेकडे गोवंश कत्तल व वाहतुकी बाबत विचारपुस करता त्याने सदर गाडीमध्ये भरलेले गोमस हे तौफिक कुरेशी व अब्दुल बारी कुरेशी (दोघे, अहमदनगर) यांचे मालकीचे आहे. गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करुन टेम्पोमधून गोमास विक्री करीता घेऊन चाललो असल्याची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्यांकडून ५ हजार किलो गोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे व वाहतुकीसाठी वापरलेला लाल रंगाचा आयशर टेम्पो असा एकूण १४ लाख ५० हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या पोना रविकिरण सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलीस ठाण्यात ८११/२०२२ भादविक २६९,३४ सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कल ५(क), ९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई नगर तालुका पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments