Monday, May 20, 2024
Homeक्राईमजमिनीच्या वादातून दोघांना जबर मारहाण ; नगर तालुक्यातील घटना

जमिनीच्या वादातून दोघांना जबर मारहाण ; नगर तालुक्यातील घटना

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर –
जमिनीच्या वादातून दोघांना जबर मारहाण झाल्याची घटना मंगळवारी (दि.२५) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नगर तालुक्यातील बाबुडी घुमट येथे घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या घटनेतील मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, चौघांना चार दिवस पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. या घटनेत कानिफनाथ मारुती भगत (वय ४५), मीनाबाई कानिफनाथ भगत (वय ४०) हे गंभीर जखमी झाले आहेत.


याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील बाबुडी घुमट येथे रविंद्र कानिफनाथ भगत‌ व आरोपी यांचा यापूर्वी २००७ मध्ये गट क्रमांक २८७ मधील जमिनीचा व्यवहार झाला. त्या जमिनीच्या वादावरून न्यायालयाने फिर्यादी यांचे बाजूने निकाल दिला असून आरोपींना मनाई हुकूम दिला होता, हा जमिनीचा वाद दिवाणी न्यायालयात सुरू आहे. त्याचा राग मनात धरून पांडुरंग शंकर बोरुडे, आदेश पांडुरंग बोरुडे, सुशांत पांडुरंग बोरुडे, सिंधुबाई पांडुरंग बोरुडे व इतर दोन अनोळखी आरोपींनी संगनमत करून रविंद्र भगत‌ यांच्या शेतात जाऊन रविंद्र कानिफनाथ भगत‌, वडील कानिफनाथ मारुती भगत (वय ४५), आई मीनाबाई कानिफनाथ भगत (वय ४०) याना तलवार, गज, काठ्या नि मारहाण डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, या रविंद्र कानिफनाथ भगत‌ यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात सहाजणांवर गुरनं ७३२/ २०२२‌‌ भादवि. कलम ३०७,१४३,१४७,१४८,१४९ शस्त्र अधिनियम ०४/२५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. अधिकारी तपास नगर ग्रामीण प्रभारी उपविभागीय अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments