Monday, May 20, 2024
HomeVideo Newsछावणी प. शाळेचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात

छावणी प. शाळेचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात

Nagar Reporter
Online news Natwork ( व्हिडिओ)
भिंगार :
छावणी परिषद शाळेच्या विविध उपक्रमामुळे विदयार्थी जे यश संपादित करत आहेत ते निश्चितच कौतुकास्पद आहे. या शाळेतील विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षक घेत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे शाळेचा गुणात्मक दर्जा वाढलेला आहे. हे विदयार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशातून दिसते आहे. शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा, संगणक आदी क्षेत्रात प्राप्त केलेले यश शिक्षकांच्या परिश्रमामुळे आहे.शाळेला भेट दिल्यानंतर प्रत्येक वेळी नवीन काहीतरी पहायला मिळते.कोविड काळातील छावनी परिषद शाळेचा ‘हर घर स्कुल’ हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी होता असे प्रतिपादन एम.आय.आर.सीचे कमांडंट व छावनी परिषद अध्यक्ष ब्रिगेडियर रसेल डिसुजा यांनी छावनी परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलना प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना केले.
यावेळी श्रीम. मेलिसा डिसुजा, मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, छावणी उपाध्यक्ष वसंत राठोड, शा.व्य.समितीचे कैलास मोहिते, विनय महाजन, अकिल शेख, उषा जोशी, कार्या.अधि. स्नेहा पारनाईक, जेष्ठ नागरिक संघाचे नगरेसर, स्नेहबंधचे उद्वव शिंदे, मुख्याध्यापक संजय शिंदे,राजेंद्र भोसले,मुबीना सय्यद आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना विक्रांत मोरे म्हणाले, सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो,छावनी परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
वसंत राठोड म्हणाले, छावनी परिषद शाळेतील शिक्षक खूप कष्ट घेऊन प्रत्येक कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे घडवून आणतात याचा विशेष अभिमान वाटतो.
यावेळी कलाशिक्षक अरविंद कुडीया यांचे वारली कलेतून तयार केलेल्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणा-या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमात स्वच्छता अभियान,शिक्षणाचे महत्व,आदिवासी बंजारा नृत्य,तानाजी गीतावरील शहारे आणणारे शौर्याने प्रेरित गीत आदी विविध नृत्याने पाहुण्यांसहीत उपस्थित भारावून गेले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुबीना सय्यद,अहवाल वाचन संजय शिंदे, सुत्रसंचालन संध्या पाटकुळकर,सिमा चोभे,विदयार्थीनी स्वालेहा फकिर, समृद्धी न-हे यांनी तर आभार राजेंद्र भोसले यांनी मानले.
दरम्यान स्नेहसंमेलना प्रसंगी कलाध्यापक अरविंद कुडिया यांचे वारली संस्कृतीतील विविध धार्मिक सण, उस्तव,आदिवासी परंपरा,त्यांची जीवनशैली वारली कलेतून साकारण-या अप्रतिम चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. ब्रिगेडियर डिसुजा,श्रीम.मेलिसा डिसुजा, मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे,वसंत राठोड आदींनी या प्रदर्शनातील कलेचे विशेष कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments