Monday, May 20, 2024
Homeक्राईमकोपर्डी हत्याकांड प्रकरण : मुख्य दोषीची कारागृहातच आत्महत्या

कोपर्डी हत्याकांड प्रकरण : मुख्य दोषीची कारागृहातच आत्महत्या

Nagar Reporter
Online news Natwork
पुणे :
राज्यात बहुचर्चित झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांड या प्रकरणातील मुख्य दोषी आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याने पुणे येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ घटना घडली आहे. जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 30) हा कोपर्डी घटनेतील मुख्य आरोपी दोषी होता. जिल्हा न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. परंतु यादरम्यान आरोपी जितेंद्र शिंदे याने आत्महत्या केली.


अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात दि.१३ जुलै २०१६ रोजी कर्जत तालुक्याती कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेला होता. या घटनेमुळे राज्यात सगळीकडेच संताप व्यक्त केला होता. या प्रकरणात जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेसह तिघांनाही दि.२९  नोव्हेंबर २०१७ रोजी अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. यासाठी एक विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली होती.
या प्रकरणात मुख्य दोषी असलेला जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे हा पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आज पहाटेच्या सुमारास मात्र त्याने कारागृहातील बराकमध्ये गळफास घेतला. कारागृहात पोलीस गस्तीवर गेले असताना जितेंद्र शिंदेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहितीची मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments