Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशकेंद्र सरकार ईडी आणि सीबीआय च्या प्रमुखांचा कार्यकाळ ५ वर्षांपर्यंत वाढवणार

केंद्र सरकार ईडी आणि सीबीआय च्या प्रमुखांचा कार्यकाळ ५ वर्षांपर्यंत वाढवणार


केंद्र सरकार ईडी आणि सीबीआय च्या प्रमुखांचा कार्यकाळ ५ वर्षांपर्यंत वाढवणार

केंद्र सरकारने ईडी आणि सीबीआयच्या प्रमुखांचा कार्यकाळ ५ वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी अध्यादेश आणला आहे.
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नवीदिल्ली-
केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)  आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या प्रमुखांचा कार्यकाळ आता पाचवर्षापर्यंत असण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने रविवारी दोन्ही संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढला आहे. त्यामुळे आता ईडी आणि सीबीआयच्या प्रमुखांचा कार्यकाळ ५ वर्षांपर्यंत वाढू शकतो.


सध्या ईडी आणि सीबीआयच्या प्रमुखांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे. सीबीआयचे प्रमुख सुबोध जैस्वाल आणि ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा आहेत. नव्या अध्यादेशानुसार सीबीआय आणि ईडी प्रमुखांची नियुक्ती पहिल्या दोन वर्षांसाठी केली जाणार आहे. यानंतर, तीन वर्षांसाठी (१+१+१) मुदतवाढ दिली जाईल. पूर्ण पाचवर्ष ते त्या पदावर राहू शकत नाहीत.
२०१८ मध्ये जारी करण्यात आलेल्या नियुक्ती आदेशात नोव्हेंबर २०२० मध्ये बदल करत केंद्र सरकारने ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला होता. संजय कुमार मिश्रा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२० मध्ये संपला होता परंतु त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
तर, १९९७ पूर्वी सीबीआय संचालकांचा कार्यकाळ निश्चित नव्हता. सरकार त्यांची कधीही बदली करू शकत होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने विनीत नारायण यांच्या निकालात सीबीआय संचालकांना स्वतंत्रपणे काम करण्याची परवानगी देण्यासाठी किमान दोन वर्षांचा कार्यकाळ निश्चित केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments