Monday, May 20, 2024
HomeVideo Newsअस्सल चैतन्य गावरण कोंबडी 'नियती ॲग्रो फार्म' खातगाव टाकळी येथे उपलब्ध :...

अस्सल चैतन्य गावरण कोंबडी ‘नियती ॲग्रो फार्म’ खातगाव टाकळी येथे उपलब्ध : ज्ञानदेव कुलट


अस्सल चैतन्य गावरण कोंबडी ‘नियती ॲग्रो फार्म’ खातगाव टाकळी येथे उपलब्ध : ज्ञानदेव कुलट

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ
अहमदनगर-
अस्सल चैतन्य गावरण कोंबडी अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात खातगाव टाकळी येथे ज्ञानदेव चंद्रभान कुलट यांच्या ‘नियती ॲग्रो फार्म’मध्ये उपलब्ध आहे, अशी माहिती नियती ॲग्रो फार्म’चे प्रमुख ज्ञानदेव चंद्रभान कुलट यांनी दिली.

‘नियती ॲग्रो फार्म’मधील गावरण कोंबड्यांना गावरणच खाद्य दिलं जाते. या ठिकाणीहून दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात चैतन्य गावरण कोंबड्यांना तसेच अंड्यांना मोठी मागणी आहे.
५० चैतन्य गावरान कोंबड्या पाहिजे असेल तर त्या नियती ॲग्रो फार्म’ कडून ४० कि.मी.अंतराच्या आत पोहच करण्याची व्यवस्था आहे. परंतु ४० कि.मी.पेक्षा जास्त अंतर असल्यास ६ रु कि.मी.अंतराने भाडे आकारण्यात येईल, असे श्री कुलट यांनी सांगितले.
ज्ञानदेव चंद्रभान कुलट यांची कोरोना काळात खासगी नोकरी गेली. यावेळी जिल्हा सहकारी बॅंकेत असणारे त्यांचे बंधू विठ्ठल कुलट यांनी हा चैतन्य गावरान कोंबड्यांचा व्यवसाय करण्याचे सुचविले. याप्रमाणे ज्ञानदेव चंद्रभान कुलट यांनी प्रथमतः २० कोंबड्यांवर व्यवसाय सुरू केला. मध्यंतरीच्या कालावधीत अडचणी आल्या,पण त्यावरही मात करीत हा चैतन्य गावरान कोंबड्यांचा छोट्याखानी व्यवसाय मोठ्या प्रगतीवर नेण्याचे काम ज्ञानदेव कुलट हे करीत आहेत. ते या चैतन्य गावरान कोंबड्यां व अंडी पाहिजे असल्यास नियती ॲग्रो फार्म’ मो.9370442001या नंबरवर संपर्क साध शकतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments