Monday, May 20, 2024
Homeक्राईमअवैध शस्त्रे बाळगणारा पोलिसांनी पकडला ; नगर एलसीबी टिम'ची कारवाई

अवैध शस्त्रे बाळगणारा पोलिसांनी पकडला ; नगर एलसीबी टिम’ची कारवाई

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर :
श्रीगोंदा तालुक्यातील उख्खलगांव या ठिकाणी अवैध शस्त्रे बाळगणारा पोलिसांनी पकडला. त्याच्याकडून ३ तलवारी जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
नामदेव रावसाहेब चंदन (वय ३१, रा. उख्खलगांव, ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
अहमदनगर एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व कर्जत डिवायएसपी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोहेकॉ बबन मखरे, पोना संतोष खैरे, पोकॉ रविंद्र घुंगासे, मच्छिंद्र बर्डे, रोहित मिसाळ आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि श्री आहेर यांनी एलसीबी टिम’ तयार करुन अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे व हत्यारे बाळगणा-या आरोपींची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना देऊन टिम रवाना केले. एलसीबी टिम’ हे अवैध शस्त्रे बाळगणा-यांची माहिती घेत असतांना दि.२५ नोव्हेंबर २०२३ रोजी पोनि श्री. आहेर यांना गुप्तबातमीदारामार्फत उख्खलगांव (ता. श्रीगोंदा) या ठिकाणी नामदेव चंदन (रा. उख्खलगांव, ता. श्रीगोंदा) याने त्याच्या चिकन शॉपमध्ये विनापरवाना बेकायदा तलवारी लपून ठेवलेल्या असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबी टिम’ने त्या ठिकाणी जाऊन त्या संबंधिताचे चिकन शॉपची माहिती काढून दुकानामध्ये असलेल्यास ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव नामदेव रावसाहेब चंदन (वय ३१, रा. उख्खलगांव, ता. श्रीगोंदा) असे असल्याचे सांगितले. त्याचे दुकानाची दोन पंचा समक्षझडती घेता त्यांचे दुकानामध्ये ३ हजार रुपये किमतीच्या ३ धारदार तलवारी मिळून आल्याने त्या तलवारी जप्त केल्या. त्याच्याविरुध्द पोकाॅ रविंद्र घुंगासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बेलवंडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५६९/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments