Monday, May 20, 2024
Homeक्राईमअल्पवयीन मुलीस पळून नेणाऱ्यास शिक्षा

अल्पवयीन मुलीस पळून नेणाऱ्यास शिक्षा


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर :
८ वर्षीच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी प्रमोद मच्छिंद्र कदम (वय ४१, रा. सुपा, ता. पारनेर) याला ३ वर्ष सक्‍तमजुरी व ९ हजार रुपयांच्या दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैदेची शिक्षा विशेष जिल्हा न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी सुनावली आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.

८ वर्षीय मुलगी ही दि.१३ सप्टेंबर २०१९  रोजी दुपारी शाळेतील मैदानात खेळत होती. यावेळी आरोपी प्रमोद मच्छिंद्र कदम हा शाळेच्या प्रवेशद्वारावर आला. पीडित मुलीस बाहेर बोलाविण्यात आले. पण, या मुलीने बाहेर येण्यास नकार दिला. त्यानंतर  प्रमोद याने “चल तुला तुझ्या पप्पांनी बोलाविले आहे’ असे म्हणून पीडित मुलीस एका निर्जन जागी  घेऊन गेला. तिच्या शरीराला वाईट हेतूने स्पर्श करू लागला. त्यामुळे पीडित मुलगी घाबरून ती मोठमोठयाने रडू लागली. ही घटना रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेने पाहिली. त्या महिलेने विद्यालयातील मुलांना मदतीला बोलवून आणले, यानंतर  अल्पवयीन मुलीची आरोपीच्या ताब्यातून सोडवणूक केली. त्या मुलीने शाळेच्या शिक्षक व मुख्याध्यापिका यांना झालेला  हा सर्व प्रकार सांगितला. मुख्याध्यापिका यांनी पीडित मुलीसह सुपा पोलिस ठाण्यात आरोपीविरूध्द फिर्याद दिली. सुपा पोलिसांनी अपहरण करणे, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2013 (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोउपनि चंद्रकांत खोसे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, शाळेच्या मुख्याध्यापिका तथा फिर्यादी, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वैद्यकिय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी-पुरावा तसेच विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांचा युक्तिवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी महिला पोलिस नंदा गोडे यांनी कामकाज पाहिले. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments